भाजपत गेलेले राणा पाटील तुळजापुरातून लढणार

रणजित खंदारे 
Tuesday, 1 October 2019

भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील १७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील १७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर व अतुल सावे या मराठवाड्यातील तीनही मंत्र्यांना व आर. टी. देशमुख वगळता सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.

वयाचे कारण समोर करून तिकीट मिळणार कि नाही अशी शंका उपस्थित केले जाणारे हरीभाऊ बागडे यांनीही तिकीट मिळविले. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या राणा जगजितसिंह पाटलांनाही उमेदवारी मिळाली आहे. 
पहिल्या यादीत औरंगाबाद, लातूर आणि जालन्यातून प्रत्येकी तीन, बीडमधील चार, नांदेडमध्ये दोन तर हिंगोली व उस्मानाबादमधून प्रत्येकी एका उमेदरांची नावे जाहिर केली आहेत. 

मतदारसंघ निहाय उमेदवार : १) फुलंब्री - हरिभाऊ बागडे, २) औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, ३) गंगापूर - प्रशांत बंब, ४)भोकरदन - संतोष दानवे, ५) बदनापूर - नारायण कुचे, ६) परतूर - बबनराव लोणीकर, ७) परळी - पंकजा मुंडे - पालवे, ८) आष्टी - भिमराव धोंडे, ९) माजलगाव - रमेश आडसकर, १०) गेवराई - अॅड. लक्ष्मण पवार, ११) तुळजापूर - राणाजगजितसिंह पाटील, १२) निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, १३) औसा - अभिमन्यू पवार, १४) अहमदपूर - विनायकराव जाधव पाटील, १५) हिंगोली - तानाजी मुटकुळे, १६) मुखेड - तुषार राठोड आणि १७) भोकर - भाऊसाहेब गोरठेकर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's Rana Patil will contest from Tuljapur