
बळसोंड परिसरातील रामकृष्णा सभागृहात शनिवारी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनायक भिसे व पप्पू चव्हाण यांचा भाजप प्रवेश सोहळा आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
हिंगोली : मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष विनायक भिसे व पप्पू चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने भाजपची ताकद वाढली असून, या दोघांनाही भविष्यात वाटचाल करण्यासाठी सुवर्ण संधी मिळाली असल्याचे प्रतिपादन जिंतूर येथील आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी शनिवारी (ता.१२) केले.
बळसोंड परिसरातील रामकृष्णा सभागृहात शनिवारी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनायक भिसे व पप्पू चव्हाण यांचा भाजप प्रवेश सोहळा आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, हरिश्चंद्र शिंदे, प्रा. दुर्गादास साखळे, के. के. शिंदे, शिवाजी पवार, प्रशांत सोनी, सुनील जामकर, यशोदा कोरडे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - हिंगोली : सेनगाव येथे रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन
प्रारंभी विनायक भिसे मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणावरून शेकडो समर्थकासह दुचाकी रॅली बळसोंडपर्यंत काढली. दुचाकी रॅली सभागृहात पोहचताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर या दोघांचाही मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश झाला.वयावेळी सभागृहात विनायक भिसे मित्र मंडळाचे शेकडो कार्यकर्ते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादन - प्रल्हाद कांबळे