Deglur Crime
sakal
देगलूर - दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा अखेर मरखेल पोलिसांनी पर्दाफाश केला. अत्याधुनिक तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली असून, आरोपींनी दाखवून दिलेल्या ठिकाणी उत्खनन करून मृतदेहाचे सांगाड्यासह अवशेष जप्त करण्यात आले.