#MarathaKrantiMorcha माजलगावला आरक्षणासाठी रक्तदान, जागरण गोंधळ 

पांडूरंग उगले
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

माजलगाव (जि. बीड) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी तहसील कार्यालयामोर सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाचा मंगळवारी (ता. सात) सातवा दिवस आहे. मंगळवारी आंदोलनस्थळी रक्तदान शिबीर, जागरण गोंधळ, पोवाड्याचे कार्यक्रम सुरु असून आंदोलकांची संख्या वाढत आहे.
रक्तदान शिबिरात मराठा तरुण मोठ्याप्रमाणात सहभाग घेत आहेत. 

दुपारपर्यंत 50 तरुणांनी रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व मराठा डॉक्टर आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. आरक्षण देण्यासाठी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सकाळपासून जागरण गोंधळ, पोवाड्याचे कार्यक्रम घेण्यात येत असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आरक्षणासाठी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून जात आहे. राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत सात दिवसांपासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात दिवसेंदिवस माजलगाव तालुक्यातील तरुण मोठ्याप्रमाणात सहभागी होत असल्याने आंदोलनाचे स्वरूप वाढले आहे.

Web Title: Blood Donation in Jalgaon for Maratha Reservation