Pachod News : तब्बल ४८ तासानंतर आर्यन उर्फ आयुषचा मृतदेह आढळला; श्यामचा शोध सुरूच..!

नांदर गावात शोककळा; चिमुकल्याच्या अंत्यसंस्कारावेळी आई, आजोबा व नातेवाइकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश.
aayush rodage and shyam rodage

aayush rodage and shyam rodage

sakal

Updated on: 

पाचोड - दोन चिमुकल्या बालकांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने हादरलेल्या नांदर (ता. पैठण) गावावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तब्बल ४८ तासांनंतर आयुष उर्फ आर्यन सोमनाथ रोडगे या सात वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी (ता. १८) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास डाव्या कालव्यात आढळून आला. दुसरा बालक श्याम रोडगे (वय पाच) याचा शोध अद्याप सुरू असून, या घटनेने परिसरात संताप, दुःख आणि हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...