Parbhani News: अपहृत तरुणाचा मृतदेह आढळला; सेलू तालुक्यातील घटना, पोलिसांकडून तपास सुरू
Parbhani Crime: परभणीतील २२ वर्षीय ओंकार गायकवाड याचा मृतदेह सेलू-देवगाव मार्गावरील निम्न दुधना कालव्यात संशयास्पद अवस्थेत आढळला. त्याच्या अपहरणाची तक्रार एका दिवसापूर्वीच वडिलांनी पोलिसांत दाखल केली होती.
सेलू : सेलू-देवगाव फाटा मार्गावरील मोरेगावजवळील निम्न दुधना प्रकल्पाचा डाव्या कालवा परिसरात रविवारी (ता. १३) सकाळी सातच्या सुमारास तरुणाचा मृतदेह आढळला. ओंकार बन्सीधर गायकवाड (वय २२, रा. संबर, ता.जि. परभणी) असे त्याचे नाव आहे.