अनोळखी महिलेचा  मृतदेह आढळला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

बीड - शहरातील जालना रोडवरील देवराज कॉम्प्लेक्‍स परिसरात एका पन्नासवर्षीय अनोळखी महिलेचा रविवारी (ता. आठ) मृतदेह आढळून आले. शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुरभे, उपनिरीक्षक मीना तुपे, पोलिस कर्मचारी अंबादास औसरमल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, महिलेच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृत महिला दोन दिवसांपासून या भागात फिरत होती. ती मनोरुग्ण असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

देवराज कॉम्प्लेक्‍सचे मालक युवराज ढाकणे यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक मीना तुपे तपास करत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of a stranger was found