gautam sonkambale pratibha sonkambale
gautam sonkambale pratibha sonkambalesakal

Biloli Accident : बोलेरो जीपच्या धडकेने दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार

बोलेरो जीपच्या धडकेने बडूर (ता. बिलोली) येथील दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार झाले.
Published on

बिलोली - बोलेरो जीपच्या धडकेने बडूर (ता. बिलोली) येथील दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार झाले. हा अपघात लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील येलमवाडीजवळ शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडला.

गौतम सोनकांबळे (वय-४५) आणि प्रतिभा ऊर्फ रमा गौतम सोनकांबळे (वय-४०) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. १३) बडूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गौतम सोनकांबळे आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा हे दोघे पती-पत्नी दुचाकीने (एमएच १२ आरक्यू ४६४२) शेताकडे जात होते. यावेळी लातूरहून भरधाव येणाऱ्या बोलोरो जीपने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात सोनकांबळे पती-पत्नी जागीच ठार झाले.

गौतम सोनकांबळे हे बडूर येथील रहिवासी असून, येलमवाडी येथे मागील अठरा वर्षांपासून ते सालगडी म्हणून कामाला होते. याविषयी अपघातग्रस्ताचा मुलगा प्रदीप सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात बोलेरो जीपचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केले. त्यांच्यावर एकाच सरणावर रविवारी बडूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांच्या पश्चात दोन मुले, आई, भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com