हिरव्या स्वप्नावर गुलाबी बोंड अळीचे संकट

अच्युत जोगदंड
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

कीटकनाशकाची फवारणी करूनही ती नष्ट होत नाही. तिला वेचून काढून जाळून टाकले तरच ती कायमची नष्ट होते, अन्यथा प्रजननक्रिया होउन संख्या झपाट्याने वाढते.

पूर्णा (जि. परभणी) - तालुक्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळी आणि हिरव्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, शेतकऱयांच्या हिरव्या स्वप्नावर संकट आले असून, शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकऱयांनी तर अळीचा प्रादूर्भाव झालेली बोंडं तोडून फेकली आहेत.

पावसाळा अर्ध्यावर येऊनही अद्याप पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे अल्प पावसात कसे तरी जगविलेल्या पिकांवर शेतकऱयांच्या आशा टिकून आहेत. त्यातून किमान लागवड खर्च निघेल, अशी अपेक्षा आहे. पण, तालुक्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळी आणि हिरव्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कीटकनाशकाची फवारणी करूनही ती नष्ट होत नाही. तिला वेचून काढून जाळून टाकले तरच ती कायमची नष्ट होते, अन्यथा प्रजननक्रिया होउन संख्या झपाट्याने वाढते, असे काही शेतकऱयांनी सांगितले.

त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळी, नापिकीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना यंदा कापसापासून थोडेफार उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पिकावर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतककरी हताश झाले असून, कृषी विभागाने पाहणी करून मार्गदर्शन करावे, अशी मागही होत आहे..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollworm on cotton at Purna (Dist. Parbhani)