

Visionary Leadership and Private Land Donations
Sakal
लोहा : नांदेड पासून अवघ्या ५२ किलोमीटर अंतरावर बोरगाव (अकनक) हे गाव लोह्याच्या पश्चिमेस आहे. हे गाव हिंदू-मुस्लीम एकतेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.
जाती - धर्माच्या भिंती केव्हाच तुटून गेलेल्या इथे पाहायला मिळतील. शिव पांदण रस्त्याची विस्तीर्ण वाट शेतमळ्यापर्यंत जाते. विस्तीर्ण रस्ते. रस्त्याच्या बाजूला फळांनी लगडलेल्या आंबेराया, संञा बागा, रेशीम उत्पादनासाठी शेतकरी पुरते गढुन गेलेले चित्र पाहायला मिळते. येथील ग्रामपंचायतचे विविध उपक्रम पथदर्शी आहेत. गाव प्रमुखांनी एकत्र येऊन स्वतःच्या पैशाने भूखंड खरेदी करत लोकहितासाठी दानपत्र करून द्यायचे ही इथली नवीन प्रथा आहे. या दानपत्रातून शाळा अंगणवाड्या उभ्या ठाकल्या.