बीड जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

मन्यारवाडी गावात पाण्याची विद्युत मोटार सुरू करत असताना वायरचा शॉक लागून दत्ता राम घाडगे या मुलाचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती गेवराई पोलिसांना कळवली.

गेवराई (जि. बीड) -विद्युत मोटार सुरू करत असताना वायरचा शॉक लागून सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २२) सकाळी सातच्या सुमारास घडली.तालुक्यातील मन्यारवाडी गावात पाण्याची विद्युत मोटार सुरू करत असताना वायरचा शॉक लागून दत्ता राम घाडगे या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती गेवराई पोलिसांना कळवली. पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिस प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शहरातील रामकिसन रोहिदास गायकवाड (वय ५२, रा. शिवाजीनगर, गेवराई) यांचा शहरातील घुंबार्डे गल्लीत घराचे बांधकाम काम करत असताना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both died in Beed district