esakal | जिल्ह्यात तीन लाख व्यक्तींना दोन्ही डोस
sakal

बोलून बातमी शोधा

JALNA

जिल्ह्यात तीन लाख व्यक्तींना दोन्ही डोस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती मिळत आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत (ता.२९) जिल्ह्यात एकूण ३ लाख २३ हजार ३११ व्यक्तींना दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत.

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १५ हजार ६८७ जणांना लस टोचण्यात आली. यात आरोग्ययोद्ध्यांत ७ जणास पहिला डोस व १० जणास दुसरा डोस असे १७ जणांचे लसीकरण झाले. फ्रन्टलाइन वर्करमध्ये १२५ जणांना दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ७ हजार २७९ जणांना पहिला डोस व ३ हजार ५३७ जणांना दुसरा डोस असे १० हजार ८१६ जणांचे लसीकरण झाले. याशिवाय ४५ ते ६० वर्ष वयोगटातील १ हजार ५७६ जणांना पहिला

डोस व ९१६ जणांना दुसरा डोस असे २ हजार ४९२ जणांचे लसीकरण झाले.

६० वर्ष वयोगटावरील १ हजार ५४८ जणांना पहिला डोस व ६८९ जणांना दुसरा डोस असे २ हजार २३७ जणांचे लसीकरण झाले. यात एकूण १० हजार ४१० जणांना पहिला तर ५ हजार २७७ जणांना दुसरा असे एकूण १५ हजार ६८७ जणांचे बुधवारी लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यात बुधवारपर्यंत एकूण ८ लाख ६६ हजार ९२७ जणांना पहिला तर ३ लाख २३ हजार ३११ जणांना दुसरा डोस असे एकूण ११ लाख ९० हजार २३८ इतके लसीकरण झाले आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

loading image
go to top