
देवणी : शितलहरीच्या परिणामातून तालुक्यासह सिमावर्ती भागातील मांजरा काठ गारठला. गुरुवारी (ता.२१) मांजरा काठी १०.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
थंडीचा कडाका वाढला
तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून थंडीचा कडाका वाढला. मांजरा, देव आणि मानमोडी या तिन्ही नदीकाठचा भूप्रदेश अक्षरशः गारठून गेला आहे. तालुक्यात मंगळवारी (ता.१९) तालुक्यात किमाल १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर कमाल २९ अंश सेल्सीअस तापमान होते. बुधवारी (ता.२०) तालुक्यात११अंश सेल्सीअस किमाल तर २८ अंश सेल्सीअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर गुरवारी (ता.२१) किमाल तापमान १०.५ अंश सेल्सीअस तर कमाल तापमान २८ अंश सेल्सीअस झाले आहे.
तालुक्यात घटलेल्या तापमानाचा फटका शेती, आरोग्य, शाळामधील उपस्थिती यासह बाजारपेठेलाही बसला आहे. घटलेल्या तापमानामुळे बागायती पिके धोक्यात आली असून बडीज्वारीची पाने करपणे, टोमँटो, काकडी या भाजीपाला वर्गीय पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे चित्र आहे. घटलेल्या तापमानामुळे बहुतांश पिकांची वाढ खुंटली आहे.
सर्दी, खोकला, ताप, चक्कर येणे यासह विविध आजाराचे प्रमाण थंडीच्या तीव्रतेमुळे जानवत आहे. शिवाय शरिराला खाज होणे हा आजारही बळावत असल्याचे चित्र आहे. सकाळच्या वेळी सुरु होणाऱ्या शाळामधील विद्यार्थी उपस्थिती घटली असून गुरुवारी दुपारपर्यंत शाळा वर्गाबाहेर भरवत कोवळ्या उन्हातच वर्ग सुरु असल्याचे चित्र होते.
घटलेल्या तापमानाचा सर्वाधिक फटका पशूंना बसत असतो. भूक मंदावणे, श्वसनाचे विकार, शरीराला कंप सुटणे, सुप्तपणा, ह्रदयाचे ठोके कमी अधिक होणे, सांधेदुखीचे आजार बळावत असल्याचे चित्र आहे. शिवाय दुग्धोत्पादनात घट होऊन जनावरे अशक्त होतात. याकाळात शक्यतो थंड वातावरणात पाणी न पाजणे, शरीरातील ऊर्जा स्थिर ठेवणे, खुराक व्यवस्थित देणे, गोठ्यात अथवा बंदिस्थ ठिकाणी गुरांना ठेवणे गरजेचे आहे. पहाटेच्या वेळी गोठ्याभोवती शेकोटी पेटवून तापमान संतुलीत ठेवण्याचा प्रयत्न आवश्यक आहे.
— डाँ अंकुश पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी
वाढलेल्या थंडीत दमा, हाड दुखणे, संधिवात यासारखे जुनाट आजार बळवत असल्याची स्थिती आहे. शिवाय सर्दी, ताप, खोकला, टाँन्सील या आजाराची रुग्णसंख्या वाढल्याची स्थिती आहे. घटलेल्या तापमानात शरीराचे तापमान संतुलीत राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. गरम कपडे परिधान करणे, रात्री व पहाटेच्या वेळी शक्यतो घराबाहेर न पडणे, आहारात गरम व ताज्या पदार्थाचा समावेश करणे, ताजी फळे, व फळांचा रस अधिक घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक, व लहान मुलांचे शरीर घटलेल्या तापमानाचा प्रतिकार कमी करते. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे असून आवश्यतेनुसार वैदयकीय उपचार घ्यावेत.
— डॉ. सुमन काळे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक अरोग्य केंद्र, वलांडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.