theft
sakal
मुरुड - मुरुड शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या आश्रमाला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. आश्रमाचे गेट आणि बेडरूमचे दरवाजे तोडून कपाटातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा पाच लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विशेष म्हणजे, पाच लाख रुपयांची बँक मुदत ठेव (एफडी) पावतीही चोरट्यांनी पळविल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.