बीड जिल्ह्यात दिवसाढवळ्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. वारंवार तक्रार करूनसुद्धा या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराडला अटक केली नसून अद्यापही तो मोकाट आहे. एकूणच बीड जिल्ह्यात गुंडगिरी प्रचंड वाढली आहे..त्यामुळे गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारावे, असे आव्हान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह विरोधकांनी दिले. बीड आणि परभणी घटनेवर मांडलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारला नसल्याने विरोधी पक्षांनी सभात्याग करत सरकारचा निषेध केला..विधानसभेचे कामकाज मंगळवारी सुरू झाल्यानंतर सुरुवातीस माजी मंत्री दत्तात्रेय राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाकडून काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे परभणीतील संविधान प्रकृतीच्या विटंबनेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, अध्यक्षांनी हस्तक्षेप करत या संवेदनशील विषयावर बुधवारी चर्चा होईल, असे जाहीर केले. तरीही नाना पटोले व अन्य नेत्यांनी चर्चेची मागणी केली..यावेळी आमदार क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनाचे प्रकरण उपस्थित केले. ते म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला एक पोलिस अंगरक्षक दिला आहे तर खुनाचा सूत्रधार वाल्मिक कराडसारख्या गुन्हेगाराला दोन पोलिस अंगरक्षक कसे दिले..पोलिसांनी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल केला, पण खुनाचा ३०२ चा गुन्हा दाखल केलेला नाही. प्रत्यक्ष खून करणारे आणि वाल्मिक कराड यांच्यातील कॉल रेकॉर्ड्स तपासले तर सत्य आपल्यासमोर येईल.’.दरम्यान सभागृहात झालेल्या चर्चेवेळी विरोधी पक्षाने परभणीतील संविधान प्रतिकृतीची विटंबना व त्यानंतर झालेला लाठीहल्ला आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरून आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी दिलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारून आजच चर्चा घ्यावी, अशी मागणी केली.मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या (ता. ११) नियम १०१ अन्वये चर्चा घेण्यात येईल, असे स्पष्ट करत स्थगन प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे संतप्त विरोधी पक्षांनी सभात्याग केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.