esakal | ब्रेकींग- इंडोनेशियाच्या १० तबलीकीनी वाढविला नांदेडचा ताप 

बोलून बातमी शोधा

file photo

इंडोनेशिया येथुन आलेल्या तबलीगच्या १० जणांनी शहरातील वातावरण ढवळून काढले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या दिल्ली येथील दोन अशा १२ जणांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेऊन शासकिय रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे.

ब्रेकींग- इंडोनेशियाच्या १० तबलीकीनी वाढविला नांदेडचा ताप 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्यातील अतिशय सुरक्षीत शहर म्हणून सध्या नांदेड शहराची ओळख होत असतांनाच इंडोनेशिया येथुन आलेल्या तबलीगच्या १० जणांनी शहरातील वातावरण ढवळून काढले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या दिल्ली येथील दोन अशा १२ जणांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेऊन शासकिय रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे. आपले अस्तीत्व लपून बसलेल्या या बारा जणांमुळे (सहा पुरुष व सहा महिला) नांदेडकरांचा ताप वाढला आहे.  

कोरोना या महामारीचा सामना करण्यासाठी मागील एक महिण्यापासून जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्याच्या सिमा सिल केल्याने कुणीही जिल्ह्यातून बाहेर तर बाहेरुन कुणी आत घेतले नाही. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र दिल्ली येथून तबलीगी जमातीतून आलेल्या व्यक्तीमुळे प्रशासन हतबल झाले आहे. त्यांनी पोलिसांमार्फत या तबलीगी जमातीच्या लोकांची धरपकड केली. त्यातील काही जण सापडले तर काही जण आपले अस्तित्व लपून बसले होते. त्यांनाही शोधून काढून क्वारंटाईन केले आहे. ते सध्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी ठेवण्यात आले असून सोमवार (ता. सहा) सायंकाळपर्यंत त्यांचा तपासणी अहवाल प्रशासनाला मिळणार आहे. 

ते बाराजण नांदेडसाठी धोकादायक तर ठरणार नाहीत ना

रविवारी (ता. पाच) एप्रिल रोजी त्यांच्या घशातील लाळेचे ‘स्वॅब’ घेऊन पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. परंतु, त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट येण्यापूर्वीच ते बाराजण नांदेडसाठी धोकादायक तर ठरणार नाहीत ना, अशी धास्तीच जणू जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि नांदेडकरांनी घेतली आहे. सोमवारी (ता. सहा) एप्रिलला सायंकाळी या बारा संशयितांच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असून, त्यांचा अहवाल निगेटीव्हच यावा अशी मनोमन प्रार्थना देखील नांदेडकरांकडून केली जात आहे.

हेही वाचा परभणीत १७१ जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

आयुर्वेदिकच्या आयसोलेशन वार्डातील पाच जणांचा अहवाल निगेटीव्ह

इंडोनेशियाहून परतलेले ते १० संशयित आणि दिल्ली येथील दोन असे बारा आणि पूर्वीचे तीन असे एकुण १५ संशयित सध्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल आहेत. तर दुसरीकडे शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातील आयसोलेशन वार्डामध्ये पाच जण ठेवण्यात आले आहेत. मात्र या पाचही जणांचा पूर्वीच स्वॅब अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठलीही भिती नसल्याचे सांगतिले जात आहे.