उमरगा (जि धाराशिव) - उमरगा शहराजवळील बाह्यवळण रस्त्याच्या कॉर्नरजवळ ऑयशर टेम्पोने दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या बहिण, भावाला जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला. शुक्रवारी (ता.१६) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला..याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील कोळसूर (गुंजोटी) येथील रहिवाशी शिवाप्पा सातप्पा मगे (वय-३८ वर्ष) हे आपली बहिण अनिता देवेंद्र माळी (वय-४८ वर्ष) रा. हिप्परगाराव (ता. उमरगा) यांना मुंबई येथे पाठविण्यासाठी बसस्थानकात आले होते..बस नसल्याने दोघेही परत कोळसुरकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले असता, उमरगा शहराच्या बाह्य वळण रस्त्याकडे जात असताना हैद्राबादकडे भरधाव वेगाने निघालेल्या ऑयशर टेम्पोने (क्र. एम एच १३ सी यु १६८६) दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक जबरदस्त होती, टेम्पोने दोघांनीही फरफटत नेले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला..अपघातानंतर टेम्पोने दुचाकीला फरफटत तसेच तुरोरी गावापर्यंत नेले. तेथे लोकांनी टेम्पो पकडला. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिस कर्मचारी व शंतनू सगर, जाहेद मुल्ला यांच्यासह कार्यकर्त्यांनी अग्निशमन वाहन बोलावून रस्त्यावर पडलेला मृतदेहाचा चेंदामेंदा पाणी टाकुन बाजुला केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.