नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून सावत्र भावाने केला भावाचा खुन

तळेगाव येथे नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.
Nitin Sasane
Nitin SasaneSakal
Summary

तळेगाव येथे नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.

अहमदपूर (जि. लातूर) - तालुक्यातील तळेगाव येथे नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील तळेगाव येथे सोमवारी (ता. 25) संध्याकाळी सातच्या सुमारास घरगुती नळाला पाणी आले होते. पाणी भरताना आरोपी गणेश बाबुराव ससाने (19 वर्ष) व त्याच्या सावत्र भावाची पत्नी जयश्री ससाणे (27 वर्ष) या दोघांमध्ये वाद झाला. जयश्रीचे पती व्यवसायाने खाजगी चालक असलेले नितीन बाबुराव ससाने (35 वर्ष) तासाभराने कामावरून घरी आले असता पत्नीने नळावर पाणी भरताना घडलेला प्रकार सांगीतला. रागाच्या भरात नितीन ससाने बाहेर जाऊन येतो असे सांगितले, व घराबाहेर पडले परंतु संध्याकाळी नऊच्या दरम्यान मानेवर खोलवर जखम झालेल्या अवस्थेत घरी आले व त्यांनी सांगितले की, गणेश याने सुरीने माझ्या गळ्यावर वार केला आहे.

जखमी अवस्थेतील नितीन ससाणे यास त्यांच्या पत्नीने गावकऱ्यांच्या मदतीने अहमदपुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी मयत झाले असल्याचे सांगितले. मयताची पत्नी जयश्री ससाणे यांच्या फिर्यादीवरून सावत्र दिर गणेश ससाणे , सासरे बाबुराव ससाणे (60 वर्ष) या दोघांविरुद्ध अहमदपूर पोलिसात गुरन 195 / 2022 कलम 302,34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपी गणेश ससाने फरार असून बाबुराव ससाणे यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चितंबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे करीत आहेत.

जयश्री ससाणे व नितीन ससाणे एका घरात तर आरोपी गणेश ससाणे व बाबुराव ससाणे दुस-या घरात राहत होते. या दोन्ही घरात नेहमीच या ना त्या कारणांवरून वाद होत होता. मागील काळात यांचे भांडणं गावातील तंटामुक्तीकडे गेली होती. मागील काळातील भांडणाचा राग व सोमवार (ता. 25) रोजी नळावर पाणी भरण्यासाठी झालेली तक्रार यामुळे राग अनावर झाला विकोपातून एका जीवास मुकावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com