
लातूर : शेतीच्या बांधावरून एका शेतकऱ्याचा छोट्या भावाने काटा काढल्याची घटना बुधवारी (ता. १४) कव्हा शिवारात घडली. दयानंद भगवान काटे (वय ५५, रा. बोपला, ता. लातूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठ तासांत भावासह त्याच्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.