Crime News : धाराशिवमध्ये बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्यामुळे १७ वर्षीय तरुणाचा चौघांनी लोखंडी रॉड व लाकडी वेळूंनी बेदम मारहाण करून खून केला. मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयात नेऊन नातेवाइकांनी आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
धाराशिव : बहिणीच्या छेडछाडप्रकरणी जाब विचारणाऱ्या तरुणाचा चौघांनी खून केल्याची घटना शहरात रविवारी (ता. ११) घडली. मारुती शिवाजी ईटलकर (वय १७) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.