Beed Crime: डोका येथे महिलेवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
Crime News : डोका गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका गटाने महिलेवर धारदार तलवार व कोयत्याने हल्ला केला. या हाणामारीत जखमी झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे, तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.
केज : जुन्या भांडणाचा गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटाने महिलेवर धारदार तलवार व कोयत्याने हल्ला चढवून शस्त्राने वार केल्याची घटना गुरुवारी (ता. ३) सकाळी डोका येथे घडली.