जिंतूर - कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने सात-आठ वार करून तीची निर्घृण हत्या तालुक्यातील सोनापूर तांडा येथे गुरुवारी (ता. २८) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विद्या विजय राठोड (वय-३२) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मातेचा मृतदेह पाहून दोन चिमुरड्यांच्या आक्रोशाने आभाळही फाटले असेल.