

Rumour Triggers Gold Loan Panic in Bhokardan
Sakal
भोकरदन : भोकरदन शहरातील बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने सोडवून घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून खातेदारांची मोठी गर्दी होत असून शाखेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पतसंस्था बंद पडणार असल्याच्या खोट्या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून एकाच वेळी ठेवी व सोनं काढून घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे.