
बीड : ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन झाली आहे. समिती तपासासाठी जिल्ह्यात तळ ठोकून आहे. या प्रकरणातील विजय पवार आणि प्रशांत खाटोकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.