Basmat Crime : पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या उपसरपंचाच्या घरी चोरी
Police Investigation : पंढरपूर वारीसाठी गेलेल्या कोनाथा गावातील उपसरपंच ओंकार बेंडे यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे ५.५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
वसमत : पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या आई-वडिलांना निरोप देण्यासाठी गेलेल्या उपसरपंचांचे घर फोडून साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील कोनाथा येथे घडली. या प्रकरणी हटा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.