esakal | जिंतूरात मुख्य रस्त्यावर तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या : चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान.
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सध्या दिवाळी सणाचे दिवस असल्याने तीनचार दिवसांपासून शहरातील बाजारपेठ गजबली असून त्यातून मंगळवार हा येथील आठवडी बाजारचा दिवस गर्दीमध्ये जास्तीची भर पडली.

जिंतूरात मुख्य रस्त्यावर तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या : चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान.

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर (जिल्हा परभणी) - शहरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावरील तीन वेगवेगळ्या ठिकाणावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोऱ्या करून लक्षावधी रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १०) उघडकीस आल्या. विशेष म्हणजे तिन्ही घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.  या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.

सध्या दिवाळी सणाचे दिवस असल्याने तीनचार दिवसांपासून शहरातील बाजारपेठ गजबली असून त्यातून मंगळवार हा येथील आठवडी बाजारचा दिवस गर्दीमध्ये जास्तीची भर पडली. या संधीचा फायदा घेत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विठ्ठल मोबाईल शॉपीमध्ये सोमवारी (ता. ९)  मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी दुकानच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील अंदाजे दहा लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती दुकान चालकाकडून प्राप्त झाली तसेच मंगळवारी (ता.१०) आठवडी दिवशी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या गर्दीचा फायदा घेऊन दुपारच्या सुपरास एका महिलेसह एका अल्पवयीन मुलीने एका किराणा दुकानावरून पंधरा लिटर खाद्यतेलाची कँन लांबविली.

हेही वाचा परभणीत तीन तर पाथरीत दहा लाखांचा गुटखा जप्त

चोरटे चोरी करतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

शिवाय दोन महिलांनी एका कापड दुकानावरून लहान मुलांचे दोन ड्रेस चोरुन नेले.या तिन्ही ठिकाणच्या घटनेतील चोरटे चोरी करतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनांमुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. एकाच दिवशी वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील या तिन्ही धाडसी चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संध्याकाळी उशिरापर्यंतपोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.परंतु पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे