एकाच प्रवाश्याला घेवून हिंगोलीतून पाहिली बसगाडी बिडकडे धावली 

राजेश दारव्हेकर
Thursday, 20 August 2020

गुरुवार पासून ता. २० सुरू झाली आहे प्रवाशांकडून पाहिल्याच दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याची स्थिती हिंगोलीत दिसून आली . 

 हिंगोली :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन मुळे पाच  महिन्यांपासून बंद असलेली एसटीची सेवा गुरुवार पासून ता. २० सुरू झाली आहे प्रवाशांकडून पाहिल्याच दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याची स्थिती हिंगोलीत दिसून आली. बस स्थानकावरुन बीडकडे धावणारी पहिली बस एकाच प्रवाशाला घेऊन धावली.

हिंगोली येथील बस स्थानकातून आज पहिली बस बीडसाठी सोडण्यात आली . अनेक प्रवाशांना आजपासून बससेवा सुरू झाली असल्याची महितीच नाही किंवा माहिती उशिरा मिळाल्याने प्रवाशी बस स्थानकाकडे फिरकले नाहीत ज्यांना माहिती मिळाली आणि कामानिमित्त बाहेरगावी जायचे असेच प्रवासी बसस्थानकावर आले होते.

हेही वाचा दारूवरून झाला वाद, पुढे काय झाले वाचा...

पहिल्या दिवशी प्रतिसाद मिळाला नसला तरी ,आजपासून सुरू झालेल्या बसचे सर्वत्र स्वागत होत आहे. हिंगोली ते बिड जाणाऱ्या बस मध्ये एकच प्रवासी घेऊन धावली असल्याचे आगारातर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, हिंगोली येथे नवीन बस स्थानकाचे काम सुरू असल्याने या बसस्थानकाच्या पाठिमागे करण्यात आलेल्या पर्यायी बस स्थानकात सर्वत्र चिखल झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच अनेक ठिकाणी पाण्याचे डबके देखील साचले आहे. याकडे लक्ष देण्याची प्रवाशातून मागणी होत आहे.आज पहिला दिवस असल्याने तसेच सकाळ पासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी नसल्याचे चित्र होते.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bus carrying the one passenger from Hingoli ran towards Beed hingoli news