esakal | अहमदपूरात जनता संचारबंदीमुळे बसस्थानक, दुकाने बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmadpur News, Janta Curfew

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी आवाहन केलेल्या 'जनता संचारबंदीला' रविवारी (ता.२२) शहर व परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला.  लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. तसेच हा रस्ता नेहमीच वर्दळीचा व गजबजलेला असतो.

अहमदपूरात जनता संचारबंदीमुळे बसस्थानक, दुकाने बंद

sakal_logo
By
उदयकुमार जोशी

अहमदपूर (जि.लातूर) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी आवाहन केलेल्या 'जनता संचारबंदीला' रविवारी (ता.२२) शहर व परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला.  लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. तसेच हा रस्ता नेहमीच वर्दळीचा व गजबजलेला असतो. मात्र रविवारी या रस्त्यावरून एकही वाहन धावताना दिसत नव्हते.  


शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून शिवाजी चौक ओळखला जातो. या ठिकाणी फळ व भाजी विक्रेते यांचे मोठ्या प्रमाणात हातगाडे लावलेले असतात. मात्र रविवारी या चौकात हातगाडे लावलेले दिसून आले नाहीत. त्याचबरोबरच या परिसरातील स्टेशनरी, कपडा, किराणा सामान, पान टपऱ्या तसेच सोन्या-चांदीचे दुकानेही बंद होती. मात्र काही औषधी दुकाने सुरू असलेली पाहावयास मिळाली.   
बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. शहरातून तालुक्याअंतर्गत प्रवास करणारे प्रवासी किंवा इतरत्र जाणाऱ्या प्रवाशांमुळे बसस्थानक नेहमीच गजबजलेले असते.

वाचा ः औशातील रस्त्यावर शुकशुकाट, जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मात्र रविवारी सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळाला. सावरकर चौकातील हॉटेल्समधून नेहमीच गर्दी असलेली दिसून येते. मात्र रविवारी ही हॉटेल्स पूर्णतया बंद होती. त्यामुळे सावरकर चौक हा निर्मनुष्य होता.एकुणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'जनता संचारबंदीच्या' आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला.  


'कोरोना'ला थोपवण्यासाठी सूचनांचे पालन करा, मंत्री देशमुखांचे नागरिकांना आवाहन

लातूर : कोणत्याही परिस्थितीत लातूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. जनतेने घाबरून न जाता दक्षता घ्यावी. शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात संशयित रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करण्यात यावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी (ता.२२) दिल्या.
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत ११ मार्चपासून परदेशाहून येणारे प्रवासी,  मुंबई आणि पुणे त्याचप्रमाणे अन्य ठिकाणाहून  येणारे नागरिक आणि कोरोनाची लक्षणे  दिसणाऱ्या रुग्णांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे.

हेही वाचा ः मुरूडकरांना खुशखबर... `त्या` युवकाचा अहवाल निगेटिव्ह

लातूरातील ३२ रुग्णांचे तपासणीतील नुमने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यापैकी २८ रुग्णांचे नमुने नकारात्मक (निगेटिव्ह) आले असून शनिवारी (ता. २१) पाठवण्यात आलेल्या चार नमुन्यांचा अहवाल रविवारी रात्रीपर्यंत येणे अपेक्षित आहे. या ३२ जणांपैकी सातजण पुण्यातील एका कोरोना सकारात्मक (पॉझिटिव्ह) रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे १४ दिवस  विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार रुग्ण मुंबईतून लातूर जिल्ह्यात आले होते. या रुग्णांचा सकारात्मक रुग्णाशी  संपर्क आल्याचे लक्षात आल्याने  त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, या चारही जणांचा अहवाल नकात्मक आला आहे. या रुग्णांचेही त्यांच्या घरी १४ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आले आहे.    
 

loading image