"बायपास'ने थांबविली "हायवे'ची मोजणी! 

हरी तुगावकर - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

लातूर - रत्नागिरी - नागपूर हा हायवे लातुरातून जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या हायवेसाठी जमीन संपादनासाठी मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू होती. औसा व चाकूर तालुक्‍यांत याची मोजणीही झाली आहे. पण लातूर तालुक्‍यातील मोजणी थांबवावी, असे आदेश भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे हायवेसाठीची मोजणी प्रक्रिया थांबली आहे. शहराच्या "बायपास' रस्त्यासाठी आता वाट पाहिली जाणार आहे. त्यामुळे काही महिने तरी हा प्रकल्पच रेंगाळण्याची शक्‍यता आहे. हा "बायपास' कधी होणार अन्‌ कोणाकोणाच्या शेतापासून जाणार याकडे आता लक्ष लागले आहे. 

"बायपास'नंतरच हायवेचा मुहूर्त लागणार आहे. पण याकरिता लातूरकरांना आता शहरापासून किमान सात-आठ किलोमीटर दूर जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

एकमेव महामार्गाचे नोटिफिकेशन 
लातूर जिल्ह्यातून रत्नागिरी ते नागपूर, जहिराबाद ते लातूर, टेंभुर्णी ते लातूर असे महामार्ग जाणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी रत्नागिरी ते नागपूर या एकमेव राष्ट्रीय महामार्गाचे नोटिफिकेशन शासनाने काढले आहे. इतर कोणत्याही महामार्गाचे नोटिफिकेशन अद्याप निघालेले नाही. रत्नागिरी ते नागपूर हा महामार्ग औसा तालुक्‍यातून लातूर पुढे चाकूरमार्गे वारंगा असा जाणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग 361 असणार आहे. 

उड्डाणपूल झाला रद्द 
हा राष्ट्रीय महामार्ग लातूर शहरातून जाणार होता. यात राजीव गांधी चौक ते नांदेड नाका असा उड्डाणपूल केला जाणार होता. पण त्याचा शहरातील बाजारपेठेवर परिणाम होईल, अशी तक्रार येथील लोकप्रतिनिधींनी केली. अनेकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन ही मागणीही लावून धरली होती. यामुळे उड्डाणपूल रद्द झाला आहे. 

सुरवातीला मोजणीची परवानगी 
या महामार्गासाठी औसा व चाकूर तालुक्‍यातील जमीन मोजणी झाली आहे. लातूर तालुक्‍यातील दहा गावांतून हा महामार्ग जाणार आहे. तेथील जमीन मोजणीचे आदेश सुरवातीला प्राधिकरणाने दिले होते. त्यात फक्त उड्डाणपुलाचा भाग सोडून मोजणी करावी, अशा सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या होत्या.

Web Title: Bypass stopped the "highway" of counting