
माजलगाव : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली. रविवारी (ता. १५) या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून यात माजलगावला लाल दिव्याची संधी मिळू शकते. पाच वर्षापुर्वी मंत्रिपदासाठी नाराज झालेल्या प्रकाश सोळंकेंना मंत्रिपद देऊन अजित पवार त्यांची नाराजी दूर करणार असल्याची सूत्राची माहिती आहे.