
वजिराबाद (जि. नांदेड) : रविवारी नागपूर येथे एकूण ३९ जणांचा मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला. मात्र, महायुतीचे नऊ आमदार असलेल्या नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नाही. यावर राज्यसभा खासदार अशोक चव्हाण म्हणाले, की मंत्रिमंडळाचा शपथविथी सर्वसमावेशक झाला आहे.