Vidhan Sabha 2019 : मतदारांचा कौल असल्यामुळे माघार नाही : राजू शिंदे 

माधव सावरगावे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : "ही निवडणूक माझी नाही तर मतदारांची आहे. मतदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणूक लढवा असे सांगितले होते, त्यामुळेच मी निवडणुकीच्या रिंगणात कायम आहे', अशी प्रतिक्रिया युतीचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांनी दिली आहे. भाजपच्या राजू शिंदे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी कायम ठेवली. राजू शिंदे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक आहेत. 

औरंगाबाद पश्चिम हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महायुती असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहिला. त्याठिकाणी युतीकडून सलग दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांना उमेदवारी देण्यात आली. आता या मतदारसंघात चुरशीची लढत दिसण्याची शक्यता आहे. कारण वंचितकडून संदीप शिरसाठ तर एमआयएमकडून अरुण बोर्डे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

राजू शिंदे हे यापूर्वी भाजपकडून महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यासोबत त्यांना महापालिकेत भाजपकडून विविध पदे मिळाली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी माघार घ्यावी म्हणून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मनधरणी केली. आज सकाळपासून त्यांचा फोन नॉट रीचेबल होता. त्यामुळे आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणुकीच्या रिंगणात राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक राजू शिंदे यांनी माघार घेतली नसल्याने युतीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

'मी सकाळपासून भांगसीमाता गडावर असल्याने फोन लागत नव्हता. मतदारांचा कौल जाणून घेऊनच मी निवडणुकीत उतरलो होतो. निवडणूक जिंकल्यानंतर मी युतीला म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पाठिंबा देणार' असे शिंदे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: candidate raju shinde from mahayuti does not withdraws his nomination from aurangabad