
आष्टी : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झालीच पाहिजे, या प्रकरणातील त्यांचे पाठीराखे आणि मुख्य सूत्रधार यांनादेखील अटक झालीच पाहिजे, अशा घोषणा देत हातात फलक घेत आष्टी शहरातून बुधवारी सायंकाळी आमदार सुरेश धस मित्रमंडळ आणि आष्टी शहर व परिसरातील नागरिकांच्या वतीने कँडल मार्च काढत निषेध करण्यात आला.