
हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी रस्त्यावर हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता गावाजवळ मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेअकराच्या दरम्यान रस्त्यावर उभ्या केलेल्या एका कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने कारमधील प्रवासी खाली उतरल्याने अनर्थ टळला. मात्र, चालक जखमी झाला.