फुलंब्री - फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मतपाटी पुलाच्या परिसरात पुलावरील दुभाजकाला कार धडकून तीन ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २४) रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे..सय्यद मारून माजीद (वय-१८ वर्ष) रा. रोशन गेट, रियान जमील शेख (वय-१६) राहणार पिंपरी राजा, अफरात असिफ शेख (वय-१७) रा. पिंपरी राजा छत्रपती संभाजीनगर असे मृत झालेल्या तिघांची नावे आहेत. उजेर फिरोज खान, शरीफ शेख या दोघांवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे..या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी केली, छत्रपती संभाजीनगर येथील पाच जण आपल्या एम. एच. २० ई. जे. १५८६ या वाहनाने छत्रपती संभाजीनगर शहरातून फुलंब्री शहराच्या परिसरात जेवणासाठी एका खाजगी हॉटेलवर आल्याची प्राथमिक माहिती आहे.दहा वाजेच्या सुमारास रात्री जेवण झाल्यानंतर सदरील कारने पुन्हा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पाचही जण रवांना झाले. छत्रपती संभाजीनगरकडे फुलंब्रीहून आठ ते दहा किलोमीटर गेल्यानंतर मतपाटी पुलाच्या परिसरात पुलावर पादचाऱ्यांना पायी जाण्यासाठी तयार केलेल्या डाव्या बाजूच्या दुभाजकालाच सदरील कारची जोरात धडक बसली..हा अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चक्का चूर झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महात्मा फुले रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन फुलंब्री पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात पाचही जखमींना दाखल केले.त्यावेळी डॉक्टरांनी तपासून सय्यद मारून माजीद, रियान जमील शेख, अफरात असिफ शेख या तिघांनाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर उजेर फिरोज खान, शरीफ शेख हे दोघे गंभीर जखमी होते. त्यामुळे फुलंब्रीत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पाचही जणांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले..त्यातील दोन जनावर संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. उजेर खान याच्यावर एमजीएम येथे उपचार झाल्यानंतर त्याला पहाटे डिस्चार्ज झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.तर शरीफ शेख याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..इतिहासाची झाली पुनरावृत्तीफुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील याच पुलावरील कठड्याला दुचाकीने धडकून अठरा वर्षांपूर्वी माणिकराव बलांडे यांचा अपघात झाला होता. या दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताच्या इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली. मंगळवारी मध्ये रात्री झालेल्या अपघातात कार चक्काचूर झाले असून तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. तर दोन जनावर उपचार सुरू आहे..फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पुलाच्या दुभाजकाला कार धडकल्याची माहिती रात्री मिळाल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका चालक देवमाळी यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी दाखल झालो. सर्व जखमींना सुरुवातीला फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. नातेवाईकांनी जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.- संजय सहाने, पोलीस निरीक्षक फुलंब्री.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.