
परळी वैजनाथ : तालुक्यातील कडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रस्त्यावर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावरुन मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते.या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी सह गाडीतील चार युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी (ता.१७) मध्यरात्री ११ ते १२ च्या सुमारास घडली.