सावधान...! शेतकऱ्यांनो कर्जासाठी असा येतो फोन

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

दहा लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देणार त्या कर्जाला कोणतेही व्याज लागणार नाही असे म्हणून आलेल्या फोनवरून शेषराव पुयड यांना सांगण्यात आले. श्री पुयड यांचा विश्वास बसल्याने त्यांनी त्यांना होकार दिला. कर्जाचा वार्षिक हप्ता एक लाख रुपये राहील व त्याप्रमाणे दहा वर्षापर्यंत तुम्हाला दहा लाखाची परतफेड करावी लागेल असेही सांगितल्याने श्री पुयड यांनी शहरातील विविध बॅंकेतून सव्वाचार लाख रुपये भरले. 

नांदेड : शहरापासून जवळच असलेल्या कामठा (खुर्द) येथील शेषराव गोपीनाथ पुयड या शेतकऱ्याला ता. १४ जानेवारी २०२० रोजी दुपारी मुंबईच्या बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्यांना फोन आला. तुमची आमच्या कंपनीकडून पॉलिसी काढून देऊ व तुम्हाला बीनव्याजी कर्ज देऊ. असे आम्ही दाखवून दहा लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देणार त्या कर्जाला कोणतेही व्याज लागणार नाही असे म्हणून आलेल्या फोनवरून शेषराव पुयड यांना सांगण्यात आले. श्री पुयड यांचा विश्वास बसल्याने त्यांनी त्यांना होकार दिला. कर्जाचा वार्षिक हप्ता एक लाख रुपये राहील व त्याप्रमाणे दहा वर्षापर्यंत तुम्हाला दहा लाखाची परतफेड करावी लागेल असेही सांगितल्याने श्री पुयड यांनी शहरातील विविध बॅंकेतून सव्वाचार लाख रुपये भरले. 

हा प्रकार त्यांनी कुणाशीही चर्चा केली नाही. शहरातील भावसार चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून आणि शिवाजीनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून तब्बल चार वेळेस चार लाख २३ हजार ८८० रुपये दिलेल्या बँक खात्यावर भरले. परंतु त्यांना परत पैसे भरण्यास भाग पाडत असल्याने त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. हा व्यवहार ता. १४ जानेवारी ते ता. चार फेब्रुवारी या दरम्यान विवेकनगर, नांदेड, पंजाब नॅशनल बँक, पूर्णा रोड, नांदेड आणि शिवाजीनगर येथील बँकेतून भरले. कर्ज मिळत नसल्याने त्यांनी भरलेले पैसे परत मागितले. 

हेही वाचाSHIV JAYANTI PHOTOS : नांदेड शहरात तरुणाईंचा उत्साह

भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा 

मात्र बजाज फायनान्स कंपनीतून बोलणाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. एवढेच नाही तर त्यांनी तुला काय करायचे ते करा असे सांगितले. यावेळी आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिरूद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन सोनवणे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Carefu This is how the farmers call for loans nanded news