
पाथरी : येथील साई मंदिर विकास आराखड्याच्या बैठकीत व्यापारी संकुलाचा (शॉपिंग कॉम्प्लेक्स) विषय का काढला, या कारणाने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी माजी नगरसेवक अलोक चौधरी यांना मारहाण करत त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी (ता. १२) दुपारी नगरपालिकेच्या आवारात घडली.