
परळी वैजनाथ : गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांतून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका चालविणाऱ्या बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर निवडणूक विभागाने शनिवारी (ता. १९) परळी येथील संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परळी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने ईव्हीएम मशीन छेडछाडीबाबतचे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला.