Dharashiv Crime : अपहार करणाऱ्या २४ ऑनलाईन सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल

धाराशिवसह बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, सोलापूर येथील २४ ऑनलाईन सेवा केंद्र चालकांचे कारस्थान आले समोर.
Crime
Crimesakal

धाराशिव - जिल्ह्यातील जवळपास तीन हजार हेक्टर सरकारी जमिनीचा २०२३ च्या खरीप हंगामासाठी पीकविमा भरून, शासकीय निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, २४ ऑनलाईन सेवा केंद्र चालकांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल १५ कोटी ६८ लाख १५ हजार १५६ इतकी विम्याची संरक्षित रक्कम हडप करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

शासनाने यासाठी ३ कोटी १३ लाख ७१ हजार ६३५ इतका निधी विमा हप्त्यापोटी संबंधित कंपनीला अदा केली आहे. १ हजार १७० बनावट शेतकऱ्यांची प्रत्येकी केवळ १ रुपया भरून सेवा केंद्र चालकांनी हे कारस्थान केले आहे.

या कारस्थानात धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील एका ऑनलाईन सेवा केंद्र चालकांसह बीड जिल्ह्यातील १६, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी २, नांदेड व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी १ आणि एक अज्ञात केंद्र चालकाचा समावेश आहे.

एचडीएफसी इग्रो विमा कंपनीचे धाराशिव जिल्हा समन्वयक हरिओम गोपालसिंह सोलंकी यांना हे कारस्थान पडताळणीत आढळून आले. त्यांनी ही बाब १९ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत निदर्शनास आणून दिली होती.

तेंव्हा बैठकीत खळबळ उडाली होती. बैठकीनंतर यावर चौकशी करून धाराशिवसह बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, सोलापूर येथील २४ ऑनलाईन सेवा केंद्र चालकांचे हे कारस्थान असल्याचे समोर आले आहे. यावर येथील कृषी उपसंचालक बाबासाहेब विश्वनाथ वीर यांनी शनिवारी (ता. ६) आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्या २४ केंद्र चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

तेच हे ऑनलाईन केंद्र चालक -

बीड जिल्ह्यातील : संग्राम प्रभू मुरकुटे(मुरकूटवाडी, ता. बीड), राहुल शिवाजी चाटे (खापरटोने, ता. आंबेजोगाई), रवी नारायण पुरी (घाटनांदूर, ता. आंबेजोगाई), लक्ष्मण विनायक आघाव (अबेगाव, ता. माजलगाव), महादेव गणपती वरकले (पहाडी पारगाव, ता. धारूर), कृष्णा बालाजी आंधळे (हेळब, ता. परळी), महेश सोमनाथ बुरांडे (धरमापुरी, ता. परळी) गजानन व्यंकट होळंबे (हेळब, ता. परळी), अजय दत्तात्रय गुट्टे (हेळब, ता. परळी), विश्वनाथ व्यंकट आघाव (हेळब, ता. परळी), अमर सुभाषराव देशमुख (परळी), धनराज महादेव होळंबे (हेळब, ता. परळी), रवींद्र दामोदर मुंढे (लिंबुटा, ता. परळी), नंदिनी रावसाहेब होळंबे (हेळब, ता. परळी), विष्णू महादेव नागरगोजे (नागदरा, ता. परळी), विजय गिरीधारी फड (धरमापुरी, ता. परळी), संभाजीनगर जिल्ह्यातील : कृष्णा राम आंधळे (धनवत, ता. सोयगाव), कुणाल जयदेव मुळे वडगाव कोल्हाटी, ता. सोयगाव), परभणी जिल्ह्यातील : संदेश वैजिनाथ मुंढे (आंतरवेली, ता. गंगाखेड), धनराज उत्तम चौधर (पराढवाडी, ता. परभणी) नांदेड जिल्हा : रघुनाथ प्रभू घोडके ( धानोरा मक्ता, ता. लोहा), सोलापूर जिल्हा : नावजी सौदागर अनभुले (उपळाई खु., ता. माढा), धाराशिव जिल्हा : पांडुरंग जयराम भोगील (दांडेगाव, ता. भूम). एक केंद्र चालक अज्ञात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com