उद्धव ठाकरेंविरोधात मराठा समाजाच्या बदनामीचा गुन्हा

विलास शिंदे - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

सामनामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या व्यंगचित्रानंतर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना उमटली होती. या  निर्णयाचे संभाजी ब्रिगेडने स्वागत केले आहे...

सेलू (परभणी)  - दैनिक सामनाच्या उत्सव पुरवणी अंकात मराठा क्रांती मुक मोर्चाचे विडंबन करून व्यंगचिञ रेखांकित केल्याप्रकरणी सामनाचे संपादक तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे अादेश येथील न्यायदंडाधिकारी  एस.अार.शिंदे यांनी दिले.

मराठा क्रांती मुक मोर्चाचे विडंबन केलेल्या व्यंगचित्रासंदर्भात अॅड.रामेश्वर शेवाळे यांनी गेल्या २५ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दाखवल्याने शेवाळे यांनी न्यायालयात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. फिर्यादीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मराठा समाजातील महिलांची बदनामीकारक व्यंगचित्र रेखाटणार्‍या दैनिक सामनाचे संपादक उध्दव ठाकरे तसेच कार्यकारी संपादक संजय राऊत व व्यंगचिञकार श्रीनिवास प्रभु देसाई या तिघांवर कलम १५६  (३) सी.आर.पी.सी.नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. सामनामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या व्यंगचित्रानंतर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना उमटली होती. 

निर्णयाचे स्वागत - संभाजी ब्रिगेड 
या  निर्णयाचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे यांनी स्वागत करत मराठा समाजाच्या भावनांचा आदर केल्या बद्दल न्यायालयाचे आभार मानले आहेत.

Web Title: Case registered against uddhav thackeray