
फुलंब्री : ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रमास यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठीची जोरदार तयारी शिक्षण विभागाने सुरु केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावण्यासाठी हा पॅटर्न नक्कीच फायदेशीर ठरू शकतो, मात्र तो प्रभावीपणे राबविण्यासाठी अनेक अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो. पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसणे हा त्यातील प्रमुख अडसर ठरू शकतो.