नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात आता ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

भगवंत सुरवसे
मंगळवार, 1 मे 2018

सीसीटिव्ही बसवलेले  ठिकाणे :-
किल्ल्याच्या मुख्य प्रवेद्वार, रंगमहाल, हुलमुख दरवाजा, दर्गा समोर, बारादरी, उपली बुरूज, नरमादी धबधबा (पाणी महाल), अंबार खाना, नऊ बुरूज, दरबार हाँल, नदीपाञातील बोटींग, या ठिकाणी हे सीसीटिव्ही कँमेरे बसवण्यात आले आहेत.  या सीसीटिव्हीचे नियंत्रण कक्ष किल्ला गेट येथील कार्यालय असून या ठिकाणी मोठ्या आकाराची स्क्रीन बसवण्यात आली आहे.

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार अाहे. किल्ला संगोपन करणाऱ्या  युनिटी मल्टिकाँन्स कंपनीने सुमारे ४० लाख रुपये खर्च करून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अंतर्गत भागातील आनेक ऐतिहासिक  वास्तुंसमोर ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत यामुळे पर्यटकांना दिलखुलासपणे वास्तू पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. यामुळे गैरप्रकारासही आळा बसणार आहे.

भुईकोट  किल्ल्यात सीसीटिव्ही बसवल्यामुळे फर्यटकांना यापुढे विनासायास पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे तसेच  हुल्लडबाज, ऐतिहासिक वास्तूवर काहीही लिहणे, पाविञ्य भंग करणे, आशा गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

सीसीटिव्ही बसवलेले  ठिकाणे :-
किल्ल्याच्या मुख्य प्रवेद्वार, रंगमहाल, हुलमुख दरवाजा, दर्गा समोर, बारादरी, उपली बुरूज, नरमादी धबधबा (पाणी महाल), अंबार खाना, नऊ बुरूज, दरबार हाँल, नदीपाञातील बोटींग, या ठिकाणी हे सीसीटिव्ही कँमेरे बसवण्यात आले आहेत.  या सीसीटिव्हीचे नियंत्रण कक्ष किल्ला गेट येथील कार्यालय असून या ठिकाणी मोठ्या आकाराची स्क्रीन बसवण्यात आली आहे.

Web Title: cctv in Naldurg fort