जेवळी (ता. लोहारा जि. धाराशिव) - येथील परिसरात गुरुवारी (ता. २९) रात्री दहा ते बारा काळात हा झालेल्या मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने बांध बंधारे फुटून शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या जोरदार पावसाने बेन्नीतुरा नदीला पूर आल्याने जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाकडून नदीत बांधण्यात आलेला सिमेंट बांधारा वाहून गेला आहे.