माहूर तालुक्यात स्मशानभुमित रेती साठे ! 

Villagers_fume_over
Villagers_fume_over

नांदेड : माहूर तालुक्यात  रेती व्यवसायाला सोन्याचे दिवस आल्याने नदीपात्राची चाळणी करुन रेती माफिया धनदांडगे झाले आहे. महसूल व पोलिस यंत्रणेला हाताशी धरून सर्रास रेतीची अवैध तस्करी माहूर परिसराला नविन नाही. शिवसैनिकाच्या वाहनावर करावाईने गुरुवारी (ता.२६) वेगळे वळन घेतले. टकाळी येथील रेती घाटावर जप्त केलेल्या रेटीसाठ्यांच्या तपासणी दरम्यान तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्यात चांगल्याच खडाजंगीच व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. 
 
तेलंगणा राज्याच्या सिमेवर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेला माहूर तालुका अवैध रेती व्यवसायासाठी मराठवाड्यात नव्हे तर विदर्भातही कुप्रसिद्ध झाला आहे. तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी गुरुवारी (ता.२६) नखेगाव फाट्याजवळ अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान, तहसीलदार श्री. वरणगावकर यांनी जानिवपूर्वक शिवसैनिकांच्या वाहनावर कारवाईचा आरोप करत शिवसैनिकांनी चांगलांच गोंधळ घातला.  इतर रेती व्यवसायिकाना सूट देऊन रेती वाहतूक करणाऱ्या शिवसैनिकांच्या वाहनांवर प्रशासन दंंडात्मक कारवार्यवाही करत असल्याचे गाऱ्हाणे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या कडे काही शिवसैक्षनकांनी मांडले. त्यानंतर उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, तालुका प्रमुख सुदर्शन नाइक, पंचायत समिती सदस्य उमेश जाधव, सोनू चारभाई व अन्य अनेक शिवसैनिकाला घेऊ घटनास्थळ गाठले. 

तहसीलदार- उपजिल्हाप्रमुखात खडाजंगी
वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्यासोबत प्रचंड मोठ्या प्रमाणात हमरीतुमरी झाल्यानंतर तणावाचे वातावरण झाल्याने तहसीलदार यांनी पोलिसांच्या मदतीने ठाण्याच्या बाहेर पडत आपले कार्यालय गाठले. काही वेळातच तहसीलदार यांच्या दालनात शिवसैनिकांनी पुन्हा जप्त केलेली रेती साठे दाखवा म्हणून गर्दी केली. तहसीलदार यांनी शिवसैनिकांचा रोष पाहून टाकळी परिसरातील जप्त रेती साठे पाहण्या करिता होकार दिल्यावर शेकडो शिवसैनकां च्या उपस्थिती मध्ये टाकली रेती घटा जवळील जप्त रेती साठ्याच्या ठिकाणी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर व शिवसैनिकमध्ये चांगलीच जुपली.

स्मशानभुमितील जप्त केलेले रेती साठे गायब झालेच कसे  
स्मशानभुमिमध्ये अवैद्य रेती साठ्यांवर जप्तीची कारवाई केलेली असताना यथील रेती साठे शासनाच्या परवानगीशिवाय गायब झालेच कसे, असा प्रश्न उपस्थिती करत उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी तहसीलदार यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर आणि उपजिल्हाप्रमुख खराटे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. उपस्थीतांनी हा संपूर्ण घटनाक्रम मोबाई कॅमेऱ्यात कैद केला. ज्यामध्ये तहसीलदार- उपजिल्हाप्रमुख यांच्यात इतका विकोपाला गेला की कोण कोणाला भांडत आहे, हेच कळत नव्हते. हा व्हिडिओ बघता बघता वायरल झाला. या व्हिडिओ मधील रेती तस्कराची व शिवसैनिकांच्या सोबत झालेली हमरी तूमरी सध्या चर्चे चा विषय बनली आहे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com