संतप्त शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाला अडविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

परभणी : केंद्रीय दुष्काळी पथकाच्या दौऱ्यातून रद्य केलेल्या पेडगाव (ता.परभणी) येथील संतप्त शेतक-यांनी रूडी (ता.मानवत) फाट्यावर पथकातील अधिका-यांच्या गाड्या अडिवण्यात आल्या. तेव्हा अधिकारी नमल्याने पथकाने पेडगावात येवून पाहणी केली. तदनंतर रूडी (ता.मानवत) आणि गणेशपूर (ता.सेलू) गावाची पाहणी केली. 

पथकाच्या नियोजित दौ-यातील पेडगावची पाहणी रद्य केली होती. तत्पूर्वी सकाळने पाहणीचा फार्स, असे वृत्तही प्रकाशित केले होते. अन्य माध्यमातूनही वृत्त प्रकाशित झाले. त्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी रूडी पाटीवर अधिका-यांच्या वाहनाचा ताफा रोखला. 

जवळपास शंभरहून अधिक शेतकरी रस्त्यावर थांबले होते. हे दृश्य पाहून पथकाला उफरती झाली. त्यांनी लागलीच गाड्या वळवून पडेगावत दाखल झाले. येथील पीक परिस्थीतीच पाहणी करून त्यांनी शेतक-यांची विचारपूस केली. दरम्यान, बीड जिल्ह्यातून पथक सकाळी साडेदहा वाजता पथकाने गणेशपूर (ता.सेलू ) येथील सर्वे नं. २० मधील महिला शेतकरी त्रिवेणी रामचंद्र गिते यांच्या कापूस पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. तदनंतर पथक प्रमुख निती आयोगाचे संयुक्त सल्लागार मानस चौधरी, पाणी व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस.सी. शर्मा, ग्रामीण विकास विभागाचे एस.एन. मेहरा यांनी शेतक-यांशी संवाद साधला. त्यांनी दुष्काळ परिस्थितीची विचारणा केली.

आयुक्त पूरषोत्तम भापकर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा कृषी अधिकारी बी.आर. शिंदे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार आसाराम छडीदार, तालुका कृषी अधीकारी श्री. कांबळे यांची उपस्थिती होती. पथकाने मनरेगाची कामे तत्काळ सुरू करण्याच्या सूचना जिल्ह्याधिका-यांना दिल्या. पंधरा मिनीट पाहणीत प्रत्यक्षशेतकर्‍यांच्या हाताला काम उपलब्ध करून द्या, असे ते म्हणाले. तदनंतर पाऊणे अकरा वाजता पथक सेलूमार्गे ते रूडी (ता.मानवत) येथे दाखल झाले. तूर्तास शेतकरी विष्णूपंत निर्वळ यांच्या शेतातील पिकांची पाहणी पथक करीत  आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central squad stopped by central squad