अतिवृष्टीने केलेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक मराठवाड्यात दाखल

मधुकर कांबळे
Sunday, 20 December 2020

केंद्रीय पथक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्यात आले आहे. आज हे पथक औरंगाबाद येथे दाखल झाले. एनडीएमएचे सहसचिव जी.रमेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आले आहे. 

औरंगाबाद : नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहे. सोमवारी हे पथक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा दौरा करून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यंदाचा पावसाळा चांगलाच लांबला, परतीच्या पावसाने जाता जाता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. यानंतर केंद्रीय पथक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्यात आले आहे. आज हे पथक औरंगाबाद येथे दाखल झाले. एनडीएमएचे सहसचिव जी.रमेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आले आहे. 

हे ही वाचा : स्वारातीत बंद एक्सरे यंत्राअभावी रुग्णांची गैरसोय ; रुग्णांवर खासगी रुग्णालयात जाण्याची आली वेळ 

सोमवारी हे केंद्रीय पथक औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालूक्यातील गाजीपुर, निलजगाव, शेक्टा, गंगापुर तालूक्यातील मुरमी, ढोरेगाव, वरखेड आणि औरंगाबाद तालूक्यातील निपाणी, पिंपळगाव या गावांमध्ये जाऊन नुकसानीची माहिती घेणार आहेत. तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव, तुळजापुर तालूक्यातील ककरंबा, अपसिंगा, कातरी तर उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव, पाटोदा गावांत जाऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती घेतील.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central teams have come to Marathwada to inspect the damage caused by heavy rains