
आडुळ ता. पैठण येथील घटना, बैठक हॉल व सरपंच यांच्या दालनातील काचा फोडल्या...
मुनाफ शेख
आडुळ ता.३१ (बातमीदार) शुक्रवारी (ता.१) रोजी देशातील सर्वात मोठा दिवाळीचा सण सर्वञ साजरा होत आहे. दिवाळी सणाला ग्राम पंचायत प्रशासन बोनस व थकित पगार देईल या आशेवर असलेल्या ग्राम पंचायत कर्मचारी यांना थकित पगार न देता त्यांच्या बँक खात्यात फक्त सहा हजार रुपये बोनस तेही गुरुवार (ता.३१) रोजी सांयकाळी चार वाजेच्या सुमारास म्हणजेच बँक बंद होण्याच्या काही मिनंटे अगोदर टाकल्याने संतप्त झालेल्या येथील झालेल्या पाणी पुरवठा कर्मचारी यांनी ग्राम पंचायत कार्यालयातील खुर्च्या अस्त व्यस्त फेकुन खिडक्या व सरपंच यांच्या दालनातील काचा आणि नेम प्लेट फोडुन रोष व्यक्त केल्याची घटना आडुळ बु. ता. पैठण येथील ग्राम पंचायत कार्यालय येथे गुरुवारी (ता.३१) रोजी सांयकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली.