तुळजा भवानी मातेची चैत्री यात्रा

महाद्वारात गर्दी आणि शहरातील अनेक भाग रिकामे अशी स्थिती पहावयास मिळाली.
Chaitri Yatra Tulja Bhavani Mata temple
Chaitri Yatra Tulja Bhavani Mata templesakal

तुळजापूर : तुळजा भवानी मातेची चैत्री यात्रा शनिवारी ता.16 पार पडली. महाद्वारात गर्दी आणि शहरातील अनेक भाग रिकामे अशी स्थिती पहावयास मिळाली.

तुळजा भवानी मातेच्या चैत्री यात्रेनिमित्त पहाटे पासून भाविक मंदीरात दश॔नासाठी दाखल झाले होते. शहरामध्ये आराधी आणि आराधिनी महिला भाविकांचे जहांजा वाजवून भाविक तुळजा भवानी मातेच्या दश॔नासाठी जात होते. तुळजा भवानी मंदीरात पहाटेपासूनच मंदीर समितीने कम॔चार्यांची नियुक्ती दश॔नाच्या नियोजनासाठी केली होती. शहरात अनेक परगावच्या लहान पालख्या चैत्री यात्रेसाठी आल्या होत्या. तुळजाभवानी मंदीरात दश॔नासाठी आलेले भाविक दश॔न मंडपातुन देवीच्या मंदीरात येत होते. तसेच दश॔न झालेले भाविक पितळी दरवाज्यापासुन बाहेर येऊन प्रदक्षिणा घेतल्यानंतर रावरंभा निंबाळकर दरवाज्यातून बाहेर येत होते.

मंदिरात भाविकांचे धार्मिक विधी.

तुळजा भवानी मंदीरात भाविकांचे धार्मिक विधी विशेषतः ओटी भरणे, पुरणपोळीचा नैवेद्य याशिवाय परड्या उजविणे यासह धार्मिक विधी पार पडत होते. तसेच तुळजा भवानी मंदीरात अजून भाविकांचे अभिषेकाबाबत प्रशासनाने निण॔य न घेतल्याने अन्य धार्मिक विधी पार पडले.

3 वर्षानंतर झाली चैत्री यात्रा.

तुळजा भवानी मातेची चैत्री यात्रा यंदा तिसर्या वर्षी पार पडली. 2020 मध्ये कोरोना तसेच 2021 मध्ये ही चैत्रीयात्रा फारशी मोठ्या प्रमाणावर झाली नव्हती. त्यामुळे यंदा चैत्री यात्रा चांगल्या प्रमाणावर झाली.

द्राक्षाची आरास.

तुळजाभवानी मातेस चैत्री यात्रेनिमित्त नगर येथील शिवाजी शिंदे, पुण्यातील प्रवेश पेठकर, सुरज परदेशी, प्रताप परदेशी या भाविकांनी द्राक्षाची सजावट केली.

साधारण 75 हजार भाविक रवाना झाले असतील.

चैत्री यात्रेनिमित्त शनिवारी येथील स्थानकातुन सोलापूर, येरमाळा, लातूर आणि अन्य ठिकाणी 75 हजार भाविक रवाना झाले असतील. : राजकुमार दिवटे, आगारप्रमुख, तुळजापूर.

भाविकांची उपस्थिती चांगली.

तुळजा भवानी मातेच्या चैत्री यात्रेस नगरपालिकेने सर्वांच्या सहकार्याने नियोजन केले. भाविकांची उपस्थिती चांगली होती. : अरविंद नातु, मुख्याधिकारी, तुळजापूर.

फोटो ओळी तुळजा भवानी मातेची चैत्री यात्रेनिमित्त द्राक्षांची आरास भाविकांनी शनिवारी ता.16 केली होती. दुसर्या छायाचित्रात तुळजाभवानी मातेच्या महाद्वारात चैत्री यात्रेच्या निमित्ताने शनिवारी ता.16 झालेली गर्दी. तिसर्या छायाचित्रात अनेक भाविक देवीच्या मूर्ती घेऊन महाद्वारात शनिवारी दाखल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com