

Latur News
esakal
चाकूर: चाकूर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये रस्त्याच्या अगदी कडेला उघड्या व असुरक्षित विहिरी असल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात या विहिरींचा अंदाज न आल्याने वाहनचालक, दुचाकीस्वारांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.